*कोंकण एक्सप्रेस*
*आपणास कळविण्यास अत्यानंद होत आहे की,*शिष्यवृत्ती परीक्षेत IES माध्यमिक विद्यालय, विजयदुर्ग प्रशालेचे यश पाचवीचे 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्य प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) 2025 या परीक्षेमध्ये माध्यमिक विदयालय विजयदुर्ग या प्रशालेने यश संपादन केले.
*इयत्ता 5 वी तील शिष्यवृत्ती धारक*
1)कुमारी:- वेदिका बापू शेळके हिने 262 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता शिष्यवृत्ती 6 वा क्रमांक प्राप्त केला असून तालुका गुणवत्ता यादीत प्रथम आली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा यादीत 6वी आली आहे.
2)कुमार:- कपिल कैलास कांबळे याने 210 गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तालुका यादीत 11 वे स्थान पटकवले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल, *IES संस्था पदाधिकारी, शालेय समिती अध्यक्ष सामंत साहेब, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक शिक्षक संघ पदाधिकारी,सर्व पालक व विद्यार्थी* वर्गातून अभिनंदन करणेत येत आहे.