*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण कला व शिक्षण विकास संस्था , मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना होणार स्कुलकीटचे वाटप*
*भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने आयोजन*
*ओरस ः प्रतिनिधी*
गुरवार दिनांक १७ जुलै रोजी सकाळी १० – ३० वाजता ओरस – सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालय – वसंत स्मृती सभागृहात* भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कुल किटचे वाटप होणार आहे . सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून केले आहे .
तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल व भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले आहे .