*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणला घेराव*
*जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवल्यास, तुमची शिवसेनेशी गाठ आहे – सुशांत नाईक*
*सुशांत नाईक, नंदू शिंदे, मंगेश लोके झाले आक्रमक*
*वैभवावाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यात महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावेत अन्यथा हे मीटर मशालीनेच जाळून टाकु असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरण च्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. वैभववाडी तालुक्यात बसविलेले स्मार्ट मीटर विरोधात आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके आक्रमक झाले. महावितरणला घेरावा घालत अधिकाऱ्यांना विचारला जाब. ग्राहकांची परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसविण्यात येतात. या मीटर चे बिल जुन्या मीटर पेक्षा चारपट येत आहे. यामुळे सर्वसाधारण जनतेची पिळवणूक होत आहे. त्यासाठी जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत ते तात्काळ काढून त्याजागी जुनेच मीटर बसवण्यात यावेत. ज्या ग्राहकांची मीटर बदलण्याची मागणी असेल त्यांचेच मीटर नवीन बसवण्यात यावेत. त्याचबरोबर गेले 3 ते 4 महिने नागरिकांन चे बिल च आले नसून आता ते बिल भरण्यासाठी नागरिकांना मुदत वाढ करून द्यावी व कोणत्याही ग्राहकांची वीज कपात करून नये. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. जर कोणी हे मीटर जबरदस्ती बसविन्याच्या प्रयन्त करत असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी शिवसेनेच्या कार्यायलाशी संपर्क साधावा असे आव्हाहन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी या अदानीच्या कंपनी सोबत बैठक घेऊन यावर विचार करायला हवा. स्मार्ट मीटर मुळे नागरिकांना पडत असलेला भुर्दंड यावर पालकांमंत्री लक्ष देणार का? असा प्रश्न यावेळी सुशांत नाईक यांनी विचारला. अश्याच प्रकारे जर पुन्हा जबरदस्ती हे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महावितरण करत असेल तर जन आक्रोश मोर्चा काढू. तसेच जबरदस्ती स्मार्ट मिटर बसवल्यास, तुमची शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी तालुका सभापती लक्ष्मण रावराणे, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, विभाग प्रमुख जितू तळेकर, यशवंत गवाणकर युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, गुलजार काझी, सूर्यकांत परब,अनिल नराम, दीपक पवार, विलास पावसकर, राजेश तावडे प्रमोद लोके, नितेश शेलार,ओमकार इस्वलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.