*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींना सरपंच आरक्षण जाहीर*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पुढील पाच वर्षे आरक्षण प्रक्रिया मंगळवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या सरपंच आरक्षणामुळे पुढे पाच वर्षे अमूक आरक्षण पडणार सरपंच म्हणून थेट निवडून येणार अशा इच्छुकांना धक्का बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतमध्ये खुला प्रवर्ग महिला सरपंच विराजमान आहे. या ठिकाणी पुढील पाच वर्षे अनुसूचित जाती महिला सरपंच राखीव झाले आहे. या इच्छुकांना धक्का बसला आहे. दोडामार्ग तालुक्यात दोन अनुसूचित जाती पैकी एक राखीव ठेवण्यात आले आहे. नागरीकांचा मागास प्रवर्ग १० पैकी पाच महिला राखीव, २४ सर्वसाधारण यापैकी १२ महिला राखीव ठेवण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थीवतीने चिड्डी काढून हे आरक्षण काढण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण खालीलप्रमाणे अनुसूचित जाती महिला साटेली भेडशी, अनुसूचित जाती: तेरवण मेढ खुला प्रवर्ग महिला :- कुडासे, तळकट, कुंब्रल, घोटगेवाडी, झोळंबे, परमे पणतुर्ली, बोडदे, बोडण, मणेरी, मांगेली, पिलूळे, मोरगाव. खुला प्रवर्ग :- आयनोडे हेवाळे, कळणे, विर्डी, कोनाळ, आयी, उसप, कुडासे खुर्द, केर, झरे-२, फुकेरी, माटणे, सासोली. ना. प्र. महिला: घोटगे, मोर्ले, कोलझर, झरेबांबर, पटये पुनर्वसन सासोली खुर्द. ना. प्र: वारे, खोक्ररल, आडाळी, आंबडगाव, तळेखोल यांचा समावेश आहे. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील अनेक सरपंच सामाजिक व राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.