सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर*

*सावंतवाडी प्रतिनिधी*

सन 2025 ते 30 या पाच वर्षांसाठीचे सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण आज जाहीर झाले. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती महिला प्रवर्गासाठी कलंबिस्त व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी सोनुर्ली तर इन्सुली, आंबोली, मळेवाड., सांगेली, गेळे, कोलगाव, शिरशिंगे, तळवणे, देवसू दाणोली, किनळे, कोलगाव या गावांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी बांदा, तळवडे., कारिवडे., वेर्ले, चराठा. माडखोल या गावांचा समावेश आहे. 63 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणासाठी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरोही अरवारीआरोही हिने चिठ्ठी टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीसाठी जिल्हा बँक संचालक महेश सारंग अशोक दळवी, चंद्रकांत कासार., चंद्रकांत जाधव, हेमंत मराठे, दिनेश सारंग आदी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!