देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज ७२ पैकी ३७ग्रामपंचायती महिलां सरपंच पदासाठी राखीव

देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज ७२ पैकी ३७ग्रामपंचायती महिलां सरपंच पदासाठी राखीव

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज ७२ पैकी ३७ग्रामपंचायती महिलां सरपंच पदासाठी राखीव*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज ७२ पैकी ३७ ग्रामपंचायती महिलां सरपंच पदासाठी राखीव

देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या सन २०२५- ३० सालच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालय येथे काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये महिलांना सरपंच पदाची लॉटरी लागली असून सरपंच पदासाठी देवगड तालुक्यात महिला राज असणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये महिला सरपंच पदांचे ३७तर पुरुष पदासाठी एकूण ३५ असे एकूण ७२ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत आज देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थी पार्थ परिमल नलावडे, जयलक्ष दत्ताराम कोयंडे, प्रणव चेतन ठाकूर या मुलांच्या हस्ते चिठ्ठीदारे काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, सुनील खरात, छाया आखाडे, विनायक शेट्ये आधी उपस्थित होते.

3:42 PM |

0.3KB/s

49

या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित ४ जागा होत्या त्यामध्ये पुरुष प्रवर्ग २, तर महिला प्रवर्गासाठी २, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित पद १ महिला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित २० जागा यामध्ये पुरुष प्रवर्ग १० महिला प्रवर्ग १०, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित एकूण ४७ जागा होत्या यामध्ये पुरुष प्रवर्गासाठी २३ तर महिला प्रवर्गासाठी २४ अशी टिकून आरक्षण सोडत ७२ पदासाठी काढण्यात आलेली आहे.

या काढलेल्या आरक्षण सोडतीमधील कोणत्या ग्रामपंचायतीसाठी असलेले आरक्षण खालील प्रमाणे

अनुसूचित जातीसाठी सरपंच आरक्षित ग्रामपंचायत पुरुष प्रवर्ग हडपिड कुणकवण, महिला प्रवर्गासाठी दहिबाव महाळुंगे.

अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पद महिला – पेंढरी ग्रामपंचायत

नागरिकांच्या मागास प्रवर्गा आरक्षित ग्रामपंचायत बुरंबावडे, उंदील, तोरसोळे, मुणगे, गवाणे, विजयदुर्ग, कातवण, कट्टा, शिरगाव, दाभोळे,

तर नामाप्र महिला प्रवर्गासाठी कुवळे, वळीवंडे, हिंदळे, पावणाई, मणचे, टेंबवली, वाडा, आरे, खुडी, फणसे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सरपंचपद

ग्रामपंचायत कुणकेश्वर, तांबळडेग, शिरवली सौंदाळे, पोभुर्ले, कोटकामते, तिर्लोट, रहाटेश्वर, पोयरे, गिर्ये, साळशी, गोवळ, फणसगाव, विठ्ठलदेवी, लिंगडाळ, मोंड, वाघोटन, रामेश्वर, घालवली, वानिवडे मळेगाव, पडवणे, ठाकुरवाडी.

तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला सरपंचपद आरक्षित ग्रामपंचायत कोर्ले, मिठमुंबरी, चांदोशी ऑबळ, नारिंग्रे, नाडण, नाद, वाधिवरे, किंजवडे, पडेल, तळवडे, बापर्डे वरेरी, मिठबाव, पाडगाव, सांडवे, चाफेड, पाटथर, पाळेकरवाडी, मोंडपार, इळये, गढीताम्हाणे, मुटाद, पुरळ. अशा पद्धतीने आरक्षण काढण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!