*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! .*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतिने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे फळसेवाडी येथील सिंधुकन्या पोलीस खात्यात अप्पर पोलीस अधीक्षक ह्या पदावर काम करते हे सिंधुदुर्गातील समस्त महिला वर्गाला अभिमानाची गोष्ट आहे , असे उद्गगार सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी काढले .
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण , जिल्हा पदाधिकारी मेघा गांगण , जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष सावी लोके , वैभववाडी मंडल अध्यक्ष प्राची तावडे ,कणकवली च्या हर्षदा वाळके , कुडाळ च्या आरती पाटील , ओसर च्या सुप्रिया वालावलकर , वेंगुर्ले च्या सुजाता पडवळ , सावंतवाडीच्या मोहिनी मडगावकर , कुडाळ च्या साधना माडिये इत्यादी उपस्थित होत्या .