शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याबद्दल भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व लाडु वाटप करुन जल्लोष !

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याबद्दल भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व लाडु वाटप करुन जल्लोष !

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामावेश केल्याबद्दल भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व लाडु वाटप करुन जल्लोष !!!*

*शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा; वेंगुर्ल्यात उत्सवी कार्यक्रमात साप्ताहिक विवेक च्या स्वराज्यप्रेरणा विशेषांक ” राष्ट्रनायक शिवछत्रपति ” या अंकांचे वाटप करुन शिवप्रेमाचा जल्लोष*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण , ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा बहाल केल्याच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात माणिक चौक येथे भाजपा च्या वतीने एक अभिमानोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शिवप्रेम, मराठी अस्मिता, आणि ऐतिहासिक गौरवाने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले.
भाजप वेंगुर्ला च्या वतिने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, तसेच विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.’जय भवानी जय शिवाजी’, ‘ छत्रपती शिवाजीमहाराज कि जय ‘ च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. काही क्षण शांततेत उभे राहून उपस्थितांनी शिवकालीन वैभवाला आणि त्यामागच्या त्यागाला अभिवादन केले.
या वेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले, “ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले हे स्वराज्याच्या विचारांचे मूर्त रूप आहेत. आता जागतिक पातळीवर त्यांचा गौरव झाल्याने आपली संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना जागतिक मान्यता मिळाली आहे.”
कार्यक्रमात महिला मोर्चा व युवा कार्यकर्त्यांनी शिवचरित्रावर आधारित घोषवाक्ये सादर केली. तसेच उपस्थित मान्यवरांनी युनेस्कोच्या निर्णयाचे स्वागत करताना ही मान्यता भावी पिढीला प्रेरणा देणारी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या मानांकनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांच्या प्रयत्नातून हे यश शक्य झाल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , मच्छिमार नेते वसंत तांडेल , मा.उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ – वृंदा गवंडळकर – श्रेया मयेकर – आकांशा परब – कृपा मोंडकर , अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार , युवा मोर्चाचे वैभव होडावडेकर – संतोष सावंत , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , आसोली उपसरपंच संकेत धुरी , सुरेंद्र चव्हाण , किसान मोर्चाचे सत्यवान पालव , ओंकार चव्हाण , ओबीसी सेलचे प्रमोद वेर्णेकर , माणिकचौक मित्रमंडळाचे रोहीत वेंगुर्लेकर – नितिश कुडतरकर – प्रथमेश यंदे – विनय गोगटे , व्यापारी सुनिल वेंगुर्लेकर – लक्ष्मण करंगुटकर – संतोष वेंगुर्लेकर , बुथ प्रमुख नामदेव सरमळकर – नारायण गावडे , ओंकार गावडे , सिल्व्हन डिसोझा , गेव्हीन मथ्थीयार इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!