*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण शहरामधील दुःखद निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण शहरातील जेष्ठ शिवसैनिक राजा शंकरदास यांच्या मुलीचे निधन झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मालवण मेढा येथे होडी दुर्घटना होऊन जितेश वाघ यांचे निधन झाल्याने वाघ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्याचबरोबर मालवण बसस्थानक येथील मधुकर जाधव यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे देखील वैभव नाईक यांच्याकडून सांत्वन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार ओरसकर, नरेश हुले, बंड्या सरमळकर, तपस्वी मयेकर, रवी तळाशीलकर, किरण वाळके, उमेश मांजरेकर, मनोज मोंडकर, नंदू गवंडी, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, भगवान लुडबे, तेजस लुडबे, श्री. लाड, हर्षद परब आदी उपस्थित होते.