*कोंकण एक्सप्रेस*
*शिष्यवृत्ती परीक्षेत ‘एस. एम.प्रशालेचे’ सुयश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त करत प्रशालेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेमध्ये पूर्व उच्च प्राथमिक विभागात (इ.5वी)1) पद्मज योगेश महाडिक – गुण 224 2) कार्तिक विकास साईल – गुण 202 या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली तर पुर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) यामध्ये 1) सुमंगल श्रीवल्लभ शिखरे -गुण 232, जस्मिता संजय पावसकर – गुण.202 ,अथर्व संतोष राठवड गुण 192 , गौरव अजित जगदाळे गुण 190 ,राजलक्ष्मी संग्राम पाटील – गुण 188 या पाच विद्यार्थ्यांनी जिल्हा शहरी विभागात शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
या परीक्षेसाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक एस. एम. नौकुडकर, सौ एन. एन. तायशेटे, व्ही.एस. सातपुते, एस.एस.पाटील सौ.पी.पी.पराडकर ,सौ.एस. सी. मयेकर ,शिष्यवृत्ती विभागप्रमुख एन.के. केसरकर व एस. एम. पवार यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे पदाधिकारी कार्याध्यक्ष डॉ.एस.सी. सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ.एस.एन.तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर तसेच मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान, पर्यवेक्षक जी.ए.कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.