पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक

*कोंकण एक्सप्रेस*

*पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक*

*पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी झाडे महत्त्वाची*

*निसर्गाचा समतोल झाडांवर अवलंबून*

*झाडे पृथ्वीवरील पर्यावरणाचा मुख्य घटक*

*राजेंद्र मगदूम विभागीय वन अधिकारी सिंधुदुर्ग*

*ओरोस ः प्रतिनिधी*

किर्लोस कृषी विज्ञान केंद्रा मार्फत वृक्ष लागवड अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी सिंधुदुर्गचे राजेंद्र मगदूम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते फणस व जांभूळ झाडांची लागवड करून केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. राजेंद्र मगदूम यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की पृथ्वीवरील पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण महत्त्वाची बाब आहे. पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व व निसर्गाचा समतोल झाडांवर अवलंबून असून झाडे पर्यावरणाचा मुख्य घटक आहेत. त्यामुळे सर्वांनी “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश आचरणात आणून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे असे ते म्हणाले. दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र वृक्ष लागवड अभियान राबवून महत्त्वाचे कार्य करत आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ते म्हणाले झाडे हे पृथ्वीचची फुफ्फुसे आहेत. झाडे ऑक्सिजन स्थिरीकरणाचे महत्त्वाचे कार्य करतात. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत व वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला पाहिजे. झाडे लावा व दीर्घ आयुष्य जगा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष प्रदीप सावंत वनपाल सदानंद परब उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ भास्कर गाजरेकर, डॉ विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, डॉ. केशव देसाई, विवेक सावंत भोसले, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत, सिद्धेश गावकर, झिलू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर उपस्थित होते. या कार्यक्रमात जांभूळ व फणसाची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन विवेक सावंतभोसले यांनी केले.

बाळकृष्ण गावडे
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र किर्लोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!