*कोकण Express*
*महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसतिगृहात झालेल्या गैरकृत्याची चौकशी करा*
*दोषींवर पोलीसांनी कारवाई करावी: अभाविप*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील संत राऊळनाथ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात डॉ अनिल नेरुळकर या परदेशी व्यक्तीने वस्तीगृहातील विद्यार्थिनीं ची झेड काढून लैंगिक छळ केला व वसतिगृहातील एका रूम मध्ये एका महिला डॉक्टर सोबत अर्धनग्न अवस्थेत लैंगिक चाळे केले असल्याचे सनसनाटी पत्र समोर आले आहे. या पत्राच्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने आज दि 1 एप्रिल रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सिद्धेश्वर डिसले यांची भेट घेऊन प्रसिद्ध झालेल्या पत्रातील बाबींची चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर पोलीस केस करावी अशी मागणी केली .
यावेळी संबंधित पत्राच्या अनुषंगाने अभविपने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थिनी वस्तीगृहात पुरुष व्यक्तीला कोणत्या नियमात रूम देण्यात आली ?
परदेशी नागरिक विद्यार्थिनी वसतिगृहात कसा जाऊ शकतो ?
वसतिगृहात लैंगिक छळ झाला आहे अशी तक्रार विद्यार्थिनींनी केली असता त्या विद्यार्थिनींवर कोणी दबाव टाकून तक्रार मागे घेण्यास लावली ?
या प्रश्नांचा खुलासा प्राचार्यांनी करावा तसेच संबंधित पत्रात उल्लेख केलेल्या बाबींची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर पोलीस तक्रार दाखल करावी . आरोप झालेली व्यक्ती ही परदेशी नागरिक असल्याने याबाबतचा सविस्तर अहवाल विदेश मंत्रालय भारत सरकारकडे पाठवावा . आरोप झालेल्या व्यक्तीला पाठीशी घालणारे संस्थेचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करावे . अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अभाविप जिल्हा संयोजक कोमल कुडपकर , जिल्हा समिती सदस्य पूजा पाटील ,पंकज कुवळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .