प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या बैठकीला अधिकारी व लोकप्रतिनिधी अनुपस्थित

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या बैठकीला अधिकारी व लोकप्रतिनिधी अनुपस्थित

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या बैठकीला अधिकारी व लोकप्रतिनिधी अनुपस्थित*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

देवगड- जामसंडे नगरपंचायत हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल प – कल्पासंदर्भात इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडलेल्या बैठकीत नगरपंचायत प्रशासन अधिकारी, नगरसेवकांनी पाठ फिरविली. त्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या पुढाकारानेच प्रकल्पाचे लाभार्थी व विकासक यांची संयुक्त बैठक आयोजित केल्याचे सांगून या बैठकीला न. पं. प्रशासन अधिकारी व नगरसेवक उपस्थित राहणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी म्हटले होते. मात्र, न. पं. प्रशासन अधिकाऱ्यांसह नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरविल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, हा प – कल्प जिद्दीने व एकजुटीने पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी ग्वाही श्री. साळसकर यांनी लाभार्थ्यांना दिली.
देवगड- जामसंडे नगर पंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मंजूर घरकुल योजनेतील प – कल्पाचे डेव्हलपर्स व लाभार्थी यांची संयुक्त बैठक गुरुवारी इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला विकासकासह न. पं. प्रशासन अधिकारी, नगरसेवकही अनुपस्थित राहिले. त्यामुळे लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र श्री. साळसकर यांनी उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल प्रकल्पाची माहिती व प्रकल्पाचे निकष समाजावून सांगितले. हा प्रकल्प देवगड- जामसंडे न. पं. हद्दीत सर्व्हे नं. ९१/१ (इ) येथील परिसरात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत साकारत असून या प्रकल्पाचे काम समर्थ मल्टीबाईझ जे-ई डेव्हलपर्स यांच्यावतीने सुरू आहे. या प्रकल्पामध्ये २.५० लक्ष शासकीय अनुदान वगळता इतर रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः भरायची आहे. त्यामुळे घरकुल योजनेंतर्गत बँक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी लाभार्थ्यांनी आतापासूनच सुरू करावी. लाभार्थ्यांनी नगर पंचायतीकडे रितसर अर्ज भरणा करून ५ हजार रुपयांची अनामत रक्कम भरली आहे. या योजनेतील लाभार्थी हे मोलमजुरी व कष्टकरी वर्गातील आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने या योजनेचे निकष, अटी व नियम अभ्यासणे गरजेचे आहे, असे श्री. साळसकर यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील महिन्यात लाभार्थ्यांसमवेत नगर पंचायत अधिकारी, प्रकल्पाचे विकासक व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पाला योग्य दिशा देण्यात येईत, असेही श्री. साळसकर यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत मनीष मोंडकर, दयानंद मांगले, प्रफुल्ल कणेरकर आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!