*कोंकण एक्सप्रेस*
*मंत्री नितेश राणे यांचा राज्य सहकार बोर्ड निवडणुकीत करिष्मा*
*विलास ऐनापुरे यांचा योग्य सन्मान ठेवू : नामदार नितेश राणे यांचा शब्द*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बंदरे विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय प्रभाव सिद्ध केला आहे. कोकण विभागातून अतुल पानसरे यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार विलास ऐनापुरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, यामध्ये नितेश राणे यांचा मोलाचा वाटा आहे.
या निर्णयामुळे कोकण विभागातून आता केवळ अतुल पानसरे यांचाच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे कोकण विभागातून पानसरे यांची बिनविरोध निवड ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विलास ऐनापुरे हे गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा मान-सन्मान कायम राखण्याचा शब्द दिला आहे.
या निवडणुकीत नितेश राणे यांनी दाखवलेले राजकीय कौशल्य, संवाद कौशल्य आणि सहकार्य यामुळे ही बिनविरोध निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. सामाजिक, राजकीय आणि सहकारी क्षेत्रात त्यांनी उमटवलेला ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या निवडणुकीमध्ये जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष गजानन सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले