थरारक पाठलाग, सुमारे ४ लाख ४२ हजार ८० रूपयांचा मुद्देमाल जप्त; कणकवली पोलीसांची अफलातून कारवाई

थरारक पाठलाग, सुमारे ४ लाख ४२ हजार ८० रूपयांचा मुद्देमाल जप्त; कणकवली पोलीसांची अफलातून कारवाई

*कोकण Express*

*थरारक पाठलाग, सुमारे ४ लाख ४२ हजार ८० रूपयांचा मुद्देमाल जप्त; कणकवली पोलीसांची अफलातून कारवाई!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या सचिन प्रभाकर वेलीप ( वय ३०, रा.केवना, शिवना दक्षिण गोवा ) याचा थरारक पाठलाग करत पोलिसांनी त्याला मुद्देमालासह पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ४ लाख ४२ हजार ८० रूपयांची गोवा बनावटीची अवैध दारू सह मुद्देमाल ताब्यात घेत कणकवली पोलिसांनी चोख अफालातून कामगिरी पार पाडली.

२ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी ही कारवाई पोलीसांनी केली. कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना गोवा बनावटीची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली २ एप्रिल रोजी मध्यरात्री हायवेवर सापळा रचला होता. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी संशयित वॅगणार कार ( GA -09 – D-2020 ) दिसताच पोलीसानी थांबण्याचा इशारा केला. मात्र कार न थांबताच सुसाट तळेरे च्या दिशेने गेली. ए.एस.आय. बापू खरात, वाहतूक पोलीस संदेश आबीटकर, रुपेश गुरव यांनी कारचा थरारक पाठलाग करून तळेरे एसटी स्टँड येथे कार पकडली. कारमध्ये ३७ बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रॅण्डिं च्या १ हजार ७७६ दारूच्या बाटल्या सापडल्या. अवैध दारूची किंमत १ लाख ४२ हजार ८० रू. असून गुन्ह्यात जप्त केलेली कारची किंमत ३ लाख आहे. याबाबत वाहतूक पोलीस संदेश आबीटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!