*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व प्रा.आ.केंद्र कनेडी यांच्या तर्फे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती फेरी*
*कनेडी ः प्रतिनिधी*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी, उपकेंद्र- सांगवे, यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कनेडी बाजारपेठेत लोकसंख्या जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
जागतिक लोकसंख्या दिन हा दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्येच्या विविध समस्यांबद्दल जागरूकता आणण्यासाठी साजरा केला जाणारा राष्ट्रीय उत्सव आहे. या दिवसाला “आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन” किंवा “जागतिक लोकसंख्या दिन” असेही म्हणतात. ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाली होती, याच दिवसाच्या स्मरणार्थ १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन घोषित केला. दरवर्षी लोकसंख्या दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. २०२५ या वर्षीची थीम “निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे” अशी आहे.
जागतिक लोकसंख्या जनजागृती फेरीमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून लोक संख्येच्या जनजागृती बाबत घोषणा दिल्या. हम दो हमारे दो, छोटे कुटुंब सुखी कुटुंब आदी घोषणांद्वारे प्रभातफेरी उत्साहात साजरा झाली. या प्रभात फेरीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनुजा भोसले, आरोग्य साहाय्यक राजेश बिडये, आशा स्वयंसेविका अमिता पेंडूरकर, मनिषा तावडे, मनस्वी गांवकर, लॅब टेक्निकल विशाल पाटील, वाहन चालक योगेश सुतार आदी कर्मचारी तसेच माध्यमिक प्रशालेतील सहा.शिक्षक मकरंद आपटे, मृणाल साटम मॅडम यांनी सहभाग घेतला.