*कोंकण एक्सप्रेस*
*वृक्षांचे संवर्धन हे जगातील एकमेव संचय संपत्ती: श्री सुभाष करावडे*
*मालवण ः प्रतिनिधी*
आज जगामध्ये प्रत्येक बाब महत्त्वाची झाली असून प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या बाबी संचय करण्यात पुढाकार घेत असतो मग ते धन असो वा संस्कार असो असे संचयरुपी संस्कार भावी पिढीमध्ये आले पाहिजे. आपण ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून दिलेले जीवदान हे आपल्या संस्कारांची शिदोरी असून आयुष्यात वृक्षांचे संवर्धन करून जगातील ही संपत्ती टिकवली पाहिजे असे उद्गार जागतिक आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने सैनिक नागरी पतसंस्था सावंतवाडी शाखा कट्टा यांनी वृक्षारोपण सप्ताह निमित्त जाहीर केलेल्या कार्यक्रमांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं) कट्टाच्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त सैनिक नागरी पतसंस्था शाखाध्यक्ष श्री सुभाष करावडे यांनी काढले. यावेळी सैनिक नागरी पतसंस्था शाखा कट्टा , वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं ) वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ.दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुनील नाईक, (सचिव)श्रीमती विजयश्री देसाई, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, शाखा समन्वयक गोपाल शांताराम बाईत ,संचालक श्री विष्णू अण्णाजी सावंत, शाखा व्यवस्थापक अनुष्का अनिल कुडतरकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, प्राचार्य श्री ध्वजेंद्र मिराशी पतसंस्था कर्मचारी हिमाली माळकर ,प्रवेश यादव, योगेश
मेस्त्री सर्व विभागाचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.