*कोंकण एक्सप्रेस*
*भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग साजरी करणार गुरुपौर्णिमा उत्सव*
*1000 पेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार गुरूंचे पाद्यपूजन*
*कणकवली/प्रतिनिधी*
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी होणारा गुरुपौर्णिमा सोहळा भारतीय जनता पार्टी तर्फे मोठ्या थाटात सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील 1000 पेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करणार आहेत. ही संकल्पना महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने राबवण्यात येत आहे व त्याला संघाच्या विचारांची जोड असल्याने हा एक धार्मिक कार्यक्रम म्हणून जिल्ह्यामध्ये गावोगावी व्हावा असा निश्चय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकर्तुत्वाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून बुवा संतोष कानडे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे