*कोंकण एक्सप्रेस*
*साई भक्त माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या बुधवारी होणार साईपालखीचे आगमन..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या बुधवार दिनांक १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री साई बाबांच्या पालखीचे आगमन होणार आहे.यावेळी साईबाबांचे भक्त असलेले आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते साईबाबांची विधीवत पूजा-अर्चा केली जाणार आहे.तरी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच गुरुवार दिनांक ११ जुलैला गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा होत असल्याने सकाळी पालखीचे प्रस्थान श्री साईबाबा मंदिर माडखोल येथे होईल.माडखोल येथील मंदिरातही विधीवत पूजापाठ,दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.*
तरी सर्व साई भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे यांनी केले आहे.