सासोलीत भरधाव आयशर टेम्पोची घराच्या शेडला धडक

सासोलीत भरधाव आयशर टेम्पोची घराच्या शेडला धडक

*कोंकण एक्सप्रेस*

*सासोलीत भरधाव आयशर टेम्पोची घराच्या शेडला धडक…*

*दोडामार्ग: शुभम गवस*

भरधाव आलेल्या कँटरने सासोलीचे सरपंच बळीराम शेट्ये यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडला धडक दिली
या अपघातात पत्र्याच्या शेडसह घरासमोर उभी असलेली ओमनी गाडीचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सासोलीचे सरपंच बळीराम शेट्ये यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयशर कँटर सासोली येथील वळणावर आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट सरपंच शेट्ये यांच्या घराच्या अंगणात शिरला धडकेमुळे पत्र्याची शेड पूर्णपणे तुटून पडली तर शेट्ये यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्या हातावर घराची कौले पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे. अंगणात उभ्या असलेल्या ओमनी गाडीलाही धडक बसल्याने तिचे मोठे नुकसान झाले. या अपघातात शेट्ये यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले की, सासोली सरपंच यांच्या घरासमोरील वळण अत्यंत धोकादायक आहे आणि यापूर्वीही त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. वाहनचालक आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोडामार्ग-बांदा मार्गावरील हे धोकादायक वळण तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!