आजी संसार सुफळ झाला गे माये देखीयले पाय विठोबाचे! वेंगुर्ला ते कालवी बंदर पायीवारीला वारक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजी संसार सुफळ झाला गे माये देखीयले पाय विठोबाचे! वेंगुर्ला ते कालवी बंदर पायीवारीला वारक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*आजी संसार सुफळ झाला गे माये देखीयले पाय विठोबाचे!
वेंगुर्ला ते कालवी बंदर पायीवारीला वारक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

खांद्यावर भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर, मुखात पडुरंगाचे नाव घेत विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात काढलेल्या वेंगुर्ला ते कालवी बंदर या आषाढी पायी वारीला वारक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पाहूं द्या रे मज विठोबाचें मुख लागलीसे भूक डोळां माझ्या‘ अशी अवस्था झालेल्या वारक-यांना सुमारे १८ किलोमिटरचा प्रवास केल्यानंतर विठोबाचे सगुण साकार रुप डोळ्यासमोर दिसताच ‘आजी संसार सुफळ झाला गे माये देखीयले पाय विठोबाचे! असे भावउद्गार प्रत्येक वार-यांच्या मुखातून निघाले.
वै.श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये ह्यांच्या प्रेरणेने वेंगुर्ला ते कालवीबंदर विठ्ठल रखुमाई मंदिर अशी आषाढी पायी वारी गेली चार वर्षे सुरु आहे. यंदाच्या या पाचव्या वर्षातील वारीला बहुसंख्य वारक-यांचा प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळी शहरातील दाभोली नाक्यावरुन या पायी वारीला सुरुवात झाली. मार्गामार्गात विठ्ठल नामाचा जयघोष करीत ही वारी दुपारी कालवी बंदर येथील मंदिरात पोहचली. यावेळी मंदिरातर्फे या पायीवारीचे स्वागत करण्यात आले. पांडुरंगाच्या कृपेने जेवढी वर्षे पायीवारी करणे शक्य आहे तेवढी वर्षे पायीवारी चालू ठेवण्याचा बाबू झांट्ये ह्यांच्या मित्रपरिवारांचा मानस आहे.
फोटोओळी – कालवी बंदर येथे निघालेल्या पायी वारीत बहुसंख्य वारकरी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!