*कोंकण एक्सप्रेस*
*९ जुलै- राष्ट्रीय विद्यार्थी दिवसानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दोडामार्ग च्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ…….*
*दोडामार्ग/शुभम गवस*
९ जुलै २०२५ रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून , दोडामार्ग तालुक्यातील इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेत ८५% व १२वी च्या बोर्ड परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्याथ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दोडामार्ग शाखेतर्फे आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम आमदार दीपकभाई केसरकर महाविद्यालय, दोडामार्ग येथे ठिक
सकाळी १० वाजता सुरू होईल..
शाळेमधून यावर्षी इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेत ८५% व १२वी च्या बोर्ड परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे टक्केवारीसहित तपशील ८ जुलै २०२५ पर्यंत खाली दिलेल्या संपर्कावर पाठवावेत, जेणेकरून त्यांच्या प्रमाणपत्रे व सत्काराची योग्यपूर्वक तयारी करता येईल.
असे आवाहन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दोडामार्ग ;दोडामार्ग शहर मंत्री मयूर तर्पे 9022078503 यांनी केलेले आहे