कासार्डे माध्यमिक विद्यालयातअवतरला पंढरपुरी आषाढी ‘रिंगण सोहळा’

कासार्डे माध्यमिक विद्यालयातअवतरला पंढरपुरी आषाढी ‘रिंगण सोहळा’

*कोंकण एक्सप्रेस*

*कासार्डे माध्यमिक विद्यालयातअवतरला पंढरपुरी आषाढी ‘रिंगण सोहळा’*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात आनंदाचीवारी मध्ये अभुतपुर्व असा ‘पालखीतील रिंगण सोहळा सादरीकरण करून पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या तालात साद घातली.ज्ञानोबा तुकाराम !,पुडिलका वरदेव हरी!! विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!! जयघोषांनी परिसर दुमदुमून सोडला.
चौकट
पालखी सोहळ्यात संतांची मांदियाळी!

या पालखीसोबत प्रशालेतील छोटे छोटे १०० पेक्षा अधिक मुले मुली सहभागी झाले होते.यात पालखीचे भोई म्हणून राज कुडतरकर व अन्वेश नारकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली तर विठ्ठल- मंथन ओटवकर,लक्ष्मण मेघारी,रूखमाई -कु.मौर्वी महाडिक व कु.गौरवी राणे यांनी तर राधा-कृष्ण ,कु.निधी मोरे,कु.सिया कोनाडकर,संत मुक्ताबाई -कु.सावी मुद्राळे, संत जनाबाई -कु.वैदेही देवरुखकर,संत मिराबाई- कु.वैष्णवी कातकर,संत बहिणाबाई-कु.ऋतिका गोसावी ,संत कान्होपात्रा – कु.रक्षा देसाई,संत चांगुला- कु.स्वरा गिरी,तर दिंडी चोपदार – वीर नकाशे,संत एकनाथ – स्वरूप कुंभार,संत सोपानदेव -आर्यन दराडे,संत नामदेव – उन्मेश कोकरे,संत तुकाराम -चैतन्य सावंत व संत निवृत्तीनाथ -अभिषेक देवरुखकर आदी विविध संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वात आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले तर मृदुंगमनी म्हणून अश्मेश लवेकर व ओम ठुकरूल यांनी उत्कृष्ट भुमिका पार पाडली.

पारंपारिक वारकरी खेळांचे सादरीकरण

या रिंगण सोहळ्यात पालखीतील विविध ‘वारकरी खेळांचे सुमारे २५ पेक्षा अधिक वारकरी बनलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पध्दतीने पारंपरिक खेळांचे अतिशय छान सादरीकरण केले.तर कु.निधी मोरे व कु. सिया कोनाडकर या दोघींनी माझ्या डोईवर घागर भरली रे ही गवळण नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

शिक्षकाचाही उत्साहात सहभाग

विविध पारंपरिक खेळांमध्ये आणि रिंगण सोहळ्यात शिक्षकांचाही उत्साहपुर्ण सहभाग होता.याप्रसंगी प्राचार्या सौ.बिसुरे बी.बी.व ए.पी. घूले यांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या.
हा रिंगण सोहळा संपन्न होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख रामचंद्र राऊळ, क्रीडा विभागप्रमुख दत्तात्रय मारकड,कला विभागप्रमुख सागर पांचाळ,पाचवी वर्गशिक्षिका सौ.सोनाली पेडणेकर,सौ.देवधर,
सौ.तृप्ती कुडतरकर,सौ.वैष्णवी डंबे,श्रीम.प्रियंका सुतार,सौ.पुजा पाताडे,
देवेंद्र देवरुखकर,विनायक पाताडे,यशवंत परब,मंदार नमसे आदींसह इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यालयातील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळा आणि रिंगण सोहळ्याचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेतला.या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि प्राचार्या व पर्यवेक्षकांनी विशेष कौतुक करूंन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!