सिंधुदुर्ग विमानतळवर नाईट लँडिंग सुविधा,मुंबई हवाई सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील:-विष्णू मोंडकर भाजपा तालुका अध्यक्ष मालवण

सिंधुदुर्ग विमानतळवर नाईट लँडिंग सुविधा,मुंबई हवाई सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील:-विष्णू मोंडकर भाजपा तालुका अध्यक्ष मालवण

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग विमानतळवर नाईट लँडिंग सुविधा,मुंबई हवाई सेवा सुरु करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील:-विष्णू मोंडकर भाजपा तालुका अध्यक्ष मालवण*

*मालवण ः प्रतिनिधी*

विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आयोजित भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे जनता दरबारात मालवण भाजप वतीने भेट घेऊन सिंधुदुर्ग (चिपी)एअरपोर्ट वर नाईट लँडिंग सुविधा होण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई विमानसेवा सुरु करावी यांसाठी मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्य मंत्री भारत सरकार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात देण्यात आले
सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र व राज्य सरकारने पर्यटन जिल्हा घोषित केला असून दरवर्षी १५ लाखापेक्षा जास्त पर्यटक पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देत असतात पर्यटनासाठी हवाई वाहतुकीला पर्यटक पसंती देत असून मुंबई हे ठिकाण देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी केंद्रबिंदू असून सिंधुदुर्ग (चिपी) एअरपोर्ट ते मुंबई ये जा विमानसेवा सुरु करावी तसेच लाईट लँडिंग उपलब्ध केल्यास विमानसेवेत वाढ होईल.तसेच पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग विमानतळ च्या कनेक्टिव्हिटी च्या माहितीसाठी पर्यटन मंत्रालय केंद्र सरकार कडून स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती प्रसिद्धी साठी पाठपुरावा करावा तसेच आवश्यतेनुसार गोवा विमानतळावर शटल सेवा सुरू करावी असे निवेदन देण्यात आले.
यावर बोलताना मुरलीधर मोहोळ विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांनी बोलतांना सांगितले की मुंबई विमानसेवा सुरु करणे सिंधुदुर्ग विमानतळावर लाईट लँडिंग सेवेसाठी अपेक्षित मार्ग काढून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मालवण यांनी दिली यावेळी अन्वेषा आचरेकर शहर महिला अध्यक्ष,महिमा मयेकर शहर सरचिटणीस मालवण तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!