*कोकण Express*
*सावंतवाडी सभापतीपदी भाजपाच्या निकिता सावंत बहुमताने विजयी*
*सेनेच्या रेश्मा नाईक यांचा 13 विरुद्ध 5 मतांनी पराभव*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या माजी उपसभापती निकिता सावंत यांची निवड बहुमताने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या रेश्मा नाईक यांचा १३ विरूद्ध ५ अशा मतांनी पराभव झाला आहे. सभापती पदासाठी झालेल्या निवडणूकीत निकिता सावंत यांनी सेनेच्या उमेदवार रेश्मा नाईक यांचा पराभव केला. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी काम पाहिले. भाजपचे काही सदस्य संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या सेनेचा डाव भाजपने उधळून लावत सेनेचा पराभव केला आहे. निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापती निकिता सावंत यांचे अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, तालुका मंडल अध्यक्ष तथा पं.स. सदस्य संदीप गावडे, शितल राऊळ, माजी सभापती तथा पं.स. सदस्य रविंद्र मडगावकर, पंकज पेडणेकर, मानसी धुरी, गौरी पावसकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, पं.स. सदस्य बाबू सावंत, सुनंदा राऊळ, श्रुतिका बागकर, अक्षया खडपे, प्राजक्ता केळुसकर आदी उपस्थित होते.
तर शिवसेनेचे सदस्य रुपेश राऊळ, मेघश्याम काजरेकर, रेश्मा नाईक, मोहन चव्हाण, मनिषा गोवेकर आदींनीही नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.