*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव महाविद्यालय येथे वृक्षारोपण*
*मनसे विद्यार्थी सेने मार्फत करण्यात आले वृक्षारोपण*
*शिरगांव ः संतोष साळसकर*
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या देवगड तालुका मार्फत पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव या महाविद्यालयात आज दिनांक ०४ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. सध्या महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत हिंदी विषय शिकवला जाईल असा जीआर काढला होता त्या जीआरला विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे तसेच संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्रभर हिंदी भाषा विरुद्ध आवाज उठवला अखेर महाराष्ट्र सरकारला देखील राज साहेबांच्या निर्णयासमोर आपला निर्णय मागे घ्यावा लागला ,आणि महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषेचा काढलेला जीआर रद्द केला ,याच गोष्टीचा आनंद म्हणूनच आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या देवगड तालुक्याच्या वतीने देवगड तालुक्यातील शाळांना महाविद्यालयांना वृक्ष भेट देऊन वृक्ष रोपण करून . महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या जीआर चा आणि मराठी भाषा तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस जिंकल्याचा आनंद उत्सव साजरा केला .
वृक्षारोपण करताना त्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी भरघोस प्रतिसाद दिला त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री अनिकेत अनंत तर्फे यांनी प्राचार्य शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री अनिकेत अनंत तर्फे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंजवडे शाखाप्रमुख प्रवीण मयेकर तसेच महाराष्ट्र सैनिक प्रथमेश परब अतीश कदम प्रसाद कदम चेतन राणे सौरभ तळवडेकर आणि महाविद्यालयातील प्राचार्य शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.