*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगावच्या कर्ले महाविद्यालयाने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकाविला*
*करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा जनजागृती अभियान स्पर्धेत यश*
*शिरगांव : संतोष साळसकर*
करिअर कट्टा उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगांवच्या पुंडलीक अंबाजी कर्ले महविद्यालयाने सर्वोत्कृष्ठ पाच महाविद्यालयात राज्यस्तरीय चौथा क्रमांक पटकावून नेत्रदिपक यश संपादन करून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विरार येथिल विवा कॉलेज यांच्या सहकार्याने महाविद्यालयामध्ये सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम २१ व २२ जून रोजी राबविण्यात आला होता त्याचा निकाल जाहीर झाला असून शिरगांवच्या पुंडलीक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महविद्यालयाने राज्यस्तरीय चौथा क्रमांक, कोकण विभागस्तरावर दुसरा कमांक तर सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून तिहेरी यश संपादन केले आहे. १०० टक्के सौर उर्जा जनजागृती अभियान राबविण्यात आल्याबद्दल राज्यातील ३३ महाविद्यालयाच्या यादीत स्थान मिळविले आहे तर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी वैष्णवी गुणाजी चौकेकर या हिने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळविला आहे. या उपक्रमास महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना प्राध्यापिका कोमल पाटील, प्राध्यापक आशय सावंत, सुरेश सुतार, निलम नाईक, सागर करडे, सुभाष खरात यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाने मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांचे शिरगांव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, संस्था पदाधिकारी व संचालक, शाळासमिती चेअरमन विजयकुमार कदम मानद अधिक्षक सुधीर साटम, संदीप साटम, प्राचार्य समीर तारी, शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे यांनी अभिनंदन केले.
चौकट
जिल्हास्तरावर प्रथम तर विभागस्तरावर व्दीतीय क्रमांक
सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाने प्रथम तर कोकण विभागात व्दीतीय क्रमांक पटकाविला. कुडाळ येथिल संत राऊळ महाराज महाविद्यालयाने जिल्हास्तरीय व्दीतीय क्रमांक मिळविला. राज्यस्तरावर विरार येथिल विवा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. हडपसर येथिल अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने व्दीतीय, महादुला कोराडी येथिल तायवाडे महाविद्यालयाने तृतीय, शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालय आणि चांदूर रेल्वे येथिल राजार्षि शाहू विज्ञान महाविद्यालय यांनी चौथा क्रमांक तर कराड येथिल भारती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाने पाचवा क्रमांक मिळविला आहे.