*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संस्थेच्या ७१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी यांच्या वतीने वार- शुक्रवार, दिनांक- ४ जुलै २०२५ रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या स्थापना दिवसाला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत.*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेची स्थापना दिनांक ४ जुलै १९५४ रोजी कनेडी या ठिकाणी करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी या शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आज या शिक्षण संस्थेने जिल्हा व राज्यस्तरावर उत्तुंग झेप घेतली आहे.*
*आजच्या स्पर्धेच्या युगात ज्ञानाच्या कक्षा या वृंदावलेल्या आहेत. आजपर्यंत संस्थेच्या शैक्षणिक संकुलातून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात जसे डॉक्टर,अभियांत्रिकी, नर्सिंग, औषध निर्माण, बँक, विमा, शिक्षण, व्यापार, पोलीस, इत्यादी क्षेत्रात यशस्वी कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षापासून संस्थेने व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देत. इयत्ता ८ वी पासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन दशकात संस्थेने केलेली प्रगती पारंपारिक शिक्षणाला फाटा देत. आधुनिक शिक्षणाकडे घेतलेली गरुड झेप कौतुकास्पद आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अटल ट्रिंकलिंग लॅब द्वारे नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.*
*गेल्या ७१ वर्षाच्या कालावधीत संस्था स्थापन झाल्यापासून आज पर्यंत संस्थेने केलेले उल्लेखनीय कार्य म्हणजे “माझी शाळा सुंदर शाळा” या शासनाच्या उपक्रमात प्रशालेने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या यशामागे संस्थेचे संस्थापक सदस्य, हितचिंतक, संस्था चालक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक यांनी घेतलेले परिश्रम आज संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीचे साक्षीदार आहेत.**संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगवे, रामेश्वर मंदिर परिसरालगत वृक्षारोपन करण्यात आले. या वृक्षारोपनासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्ही.बी.सावंत, शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत, आदी सदस्य तसेच दैनिक पुढारीचे पत्रकार नितीन सावंत, बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते*.