*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत माता-पालक व किशोरवयीन मुलींना मागदर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- बुधवार, दिनांक- २ जुलै २०२५ रोजी, प्रशालेत आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्षा, किशोरवयीन मुलींना व माता- पालक यांना शरीरिक आरोग्य व संवर्धन याबाबत मार्गदर्शन आणि हिमोग्लोबीन तपासणी शिबीर घेण्यात आले.*
*उत्तम व चांगले आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. याच अनुषंगाने प्रशालेत वर्षभर मुलांना विविध प्रकारे आरोग्य विषयक मार्गदर्शन व शिबीरे आयोजित केली जातात. उत्कर्षा अंतर्गत विशेष आरोग्य वर्गाचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक डॉ. कु. स्वप्नाली मेस्त्री, आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगवे यांनी मुलींना दैनंदिन आहार व मासिक पाळी तसेच आरोग्य याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.*
*या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, प्रमुख उपस्थिती प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला कर्मचारी, माता- पालक व महिला आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षिका पी.एल. हाटले यांनी केले.*