*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा स्तुत्य उपक्रम- “बांधावरची शाळा”*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कनेडी वार्ताहर- दरवर्षी १ जुलै महाराष्ट्रात कृषी दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृति दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.आपल्या कृषीप्रधान देशातील महाराष्ट्र राज्य प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. याच कृषी दिनाचे औचित्य साधत १ जुलै २०२५ रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत “बांधावरची शाळा” हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ज्यात मुलांना प्रत्यक्ष भात शेती विषयक प्रात्यक्षिक शिकविण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांना श्रमप्रतिष्ठा तसेच निसर्गाबद्दल आदर वाढायला मदत होते.
सदर उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भात शेतीचा आनंद लुटत भात शेतीची लागवड केली. प्रशालेतील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुविध कौशल्य अभ्यासक्रम विभागातील शिक्षक व विद्यार्थी यांनी भात शेतीची लागवड करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.