प्रज्योती फाउंडेशनच्या प्रज्योती पुस्तक पेढी सामाजिक व शैक्षणिक संस्था, जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रज्योती फाउंडेशनच्या प्रज्योती पुस्तक पेढी सामाजिक व शैक्षणिक संस्था, जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रज्योती फाउंडेशनच्या प्रज्योती पुस्तक पेढी सामाजिक व शैक्षणिक संस्था, जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

प्रज्योती फाउंडेशन मुंबई ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई सह कोकणात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत.ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्था विशेष प्रयत्न करत आहेत.याचाच भाग म्हणून त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रज्योती फाउंडेशनच्या प्रज्योती पुस्तक पेढी सामाजिक व शैक्षणिक संस्था जोगेश्वरी मुंबई यांच्या वतीने व वासल्य चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने मोफत वह्या वाटप आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाचा अधिकचा अभ्यास करून गुणवत्ता वाढवता यावी यासाठी संस्थेचे संचालक आणि नरडवे गावचे सुपुत्र श्री अशोक राणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण, मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.श्री.अशोक राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उज्वल आणि आपल्याला व पालकांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच शिक्षण घेत असताना संस्कारक्षम जीवन कसे जगावे याबाबतही मार्गदर्शन केले.तसेच प्रज्योती फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेताना उद्देश काय आहे हे सांगितले.शालेय समिती अध्यक्ष श्री सहदेव चव्हाण यांनी प्रज्योती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या व साहित्य वाटपाबाबत धन्यवाद दिले.प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक करताना भविष्यात आपल्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी प्रज्योती फाउंडेशनने सहकार्य करावे असे आवाहन केले आणि संस्थेला व श्री.अशोक राणे यांना धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांच्या वतीने कु.विशाका पारकर हिने प्रज्योती फाउंडेशनचे आणि श्री.राणे सर यांचे आभार मानले. शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबईचे सरचिटणीस श्री.तुषार राऊत आणि मुख्याध्यापक श्री वामन तर्फे यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे आभार सहाय्य शिक्षक श्री.राजेश धाडगा सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!