*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला सेवानिवृत्त प्रयोगशाळा परिचर श्री विश्वास कांबळे यांनी चरित्र ग्रंथांची देणगी दिली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या ग्रंथालयाला सेवानिवृत्त कर्मचारी श्री विश्वास सखाराम कांबळे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चरित्र वाङ्मय ग्रंथांची भेट देवून उपकृत केले या चरित्र ग्रंथाची सुंदर मालिका प्रशालेच्या ग्रंथांच्या विकासासाठी महत्वाची आहे चरित्र ग्रंथांच्या वाचनामुळे मूल्यसंस्कार निर्माण होऊन आदर्श आचरण आत्मसात होऊन नवनिर्माण पिढीला मार्गदर्शक ठरेल . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी श्री विश्वास कांबळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आणि प्रशालेच्या ग्रंथसंग्रहात भर टाल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले यावेळी ग्रंथपाल श्री महानंद पवार सर श्री शेळके जेजे सर श्री प्रसाद राणे सर वनपस्ती शास्राचे अभ्यासक प्रा गावडे सर उपस्थित होते .