सिंधुदुर्ग जिल्ह्यात व देवगड तालुक्यात खतांची मोठी टंचाई – शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली तहसीलदार कार्यालयावर धडक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व देवगड तालुक्यात खतांची मोठी टंचाई – शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली तहसीलदार कार्यालयावर धडक

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात व देवगड तालुक्यात खतांची मोठी टंचाई – शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली तहसीलदार कार्यालयावर धडक*

*पालकमंत्री ठेकेदेण्यात मग्न, सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनबाबत उदासीनता – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या खतांचे वाटप करण्यात आले यात काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना या खतांचा तुटवडा सिंधुदुर्ग जिल्हासहित देवगड तालुक्यात भासत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणात रखडली जात आहेत प्रसंगी खाजगी विक्रेत्या अधिक दराने या खतांची विक्री करत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले खते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावीत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत, नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देवगड
तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री राणे यांनी याचा आढावा घेणे गरजेचे होते, गेल्यावर्षी ह्याच खतांच्या टंचाईला शेतकरी समोर गेला होता. मागील वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री यांच्या मतदारसंघात बोगस खतांची तक्रार देखील करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनबाबत आढावा बैठक घेऊन शेतीविषयक मुद्द्यांवर उपाययोजना करणे गरजेचे होते, परंतु ठेकेदेण्यात मजबूल असलेले पालकमंत्री यांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येते. यात नमूद केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आवश्यक त्या खताचा साठा उपलब्ध होत नसून यामध्ये युरिया, सुफला, संपूर्ण रविराज, ऍग्रो डीएपी, कृषी उद्योग, सिंगल सुपर फॉस्फेट ऑफ पोटॅश सल्फर ऑफ पोटॅश या सर्व शेतीसाठी उपयुक्त असल्या खतांचा तुटवडा तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक आहेत ही सर्व खते देवगड तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी अति महत्त्वाचे असून या सर्व खतांचा तुटवडा आहे भात शेतीसाठी मिश्र खते लागतात यामुळे शेतकऱ्यांची लावणीची कामे रखडलेली आहेत. ही सर्व खते येत्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावीत, प्रसंगी आवश्यक असणारी खते ही वाढीव दराने विक्री करावी खरेदी करावी लागत असून अशा पद्धतीचा विक्रेता वाढीव दराने खतांची विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी शिवसेना शाखेशी संपर्क साधावा असे आवाहनही या पत्राद्वारे करण्यात आले आहे या खतांचा आवश्यक असलेल्या खतांचा लवकरात लवकर आवश्यक तो साठा उपलब्ध करून देण्यात यावा अथवा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या वतिने लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने देवगड तहसीलदार रमेश पवार यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा केली तसेच तालुका कृषी विभागाच्या प्रतिनिधींशी देखील यावर चर्चा करून यावर योग्यती कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर,महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, उपतालुकाप्रमुख दादा सावंत, महिला विभाग प्रमुख रेश्मा सावंत, काका जेठे, सुनील तेली, दिनेश नारकर, विष्णू घाडी, राजू वाळके,लक्ष्मण तारी, नगरसेवक नितीन बांदेकर, तेजस मामघाडी, विभागप्रमुख विकास कोयंडे, प्रफुल्ल कनेरकर, गणेश कांबळी, मंगेश फाटक, महेंद्र भुजबळ, योगेश गोळम, गौरव सावंत, शिवदास नरे, संजय देवरुखकर, सचिन खडपे, राजीव वाळके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!