*कोकण Express*
*ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजनेत सिंधूदुर्ग राज्यात प्रथम*
*देशात ९३ वा : २०१६-१७ पासून केलेल्या कामाच्या आधारावर काढले रँकिंग*
*सिंधूदुर्गनगरी ता १*
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना रँकिंगमध्ये सिंधूदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. तर देशात ९३ वा आला आहे. नवी मुंबई येथील आवास योजनेच्या राज्य व्यवस्थापन कक्षाने हे रँकिंग जाहिर केले आहे. यात रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. २०१६-१७ मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण आवास योजनेची ब यादी निश्चित करीत प्रत्येक जिल्ह्याला लाभार्थी निश्चित करून दिले होते. सिंधूदुर्ग जिल्ह्याला ३ हजार ९९४ लाभार्थी होते. गेल्या पाच वर्षात लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करणे. १५ हजार रूपयांचा पहिला हप्ता वितरित करणे. आधार सिडिंग, ग्रामसभा ठराव अशा विविध मुद्दयांवर गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीच्या जोरावर हे रँकिंग तयार करण्यात आले आहे.