शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा*

*मालवण ः  प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्यासह शिवसेना व भाजपचे अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून ना. नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, संतोष कोदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!