*कोंकण एक्सप्रेस*
*भाजप बांदा मंडल तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन*
*बांदा ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी बांदा मंडल तर्फे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे प्रखर देशभक्त आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदान दिन स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा मंडलच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्ते शामकांत काणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमोद कामत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. यावेळी प्रा. शिवानंद भिडे व श्याम काणेकर यांनी डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या कार्याची आणि देशाकरता दिलेल्या बलिदान व त्यांच्या जीवन चरित्राबद्दल मार्गदर्शन केले. बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी आभार व दादू कविटकर यांनी प्रास्ताविक केले याप्रसंगी माजी सरपंच शितल राऊळ,बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर,शक्ती केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर,शहराध्यक्ष बाबा काणेकर,ग्रा.सदस्य रत्नाकर आगलावे, निलेश कदम, बुथ अध्यक्ष राकेश केसरकर, शैलेश केसरकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर बलिदान दिनानिमित्त येथील खेमराज हायस्कूलच्या परिसरात धूप व महोगनी या झाडांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी बांदा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, बांदा वनरक्षक प्रमोद सावंत, बांदा तलाठी फिरोज खान,खेमराज हायस्कूलचे प्राचार्य नंदकिशोर नाईक, सरपंच प्रियांका नाईक, स्वागत नाटेकर, गुरु कल्याणकर, बाबा काणेकर,रत्नाकर आगलावे,निलेश कदम, राकेश केसरकर,शैलेश केसरकर,दर्पण आळवे, तेजस परब, अक्षय मयेकर, सुनील राऊळ व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना वनरक्षक प्रमोद सावंत यांनी उपक्रमाचे कौतुक केले.तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी असेच उपक्रम घेण्याचे आवाहन देखील केले.