*कोंकण एक्सप्रेस*
*कै श्रीधरराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी आमदार वैभवजी नाईक यांनी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थांना वह्या वाटप केल्या*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना माजी आमदार वैभवजी नाईक साहेब सुशांत नाईक व संकेत नाईक यांनी कै . श्रीधरराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशालेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कांबळे पी जे सरांनी नाईक कुटुंबियांच्या दातृत्वाचे कौतुक केले विद्यासंदिर प्रशाला ही ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची शाळा आहे विद्यार्थांची शैक्षणिक गरज ओळखून माजी आमदार श्री वैभवजी नाईक आणि श्री सुशांत नाईक व संकेत नाईक या तिघा बंधूनी मिळून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक भावना ओळखून नाईक कुटुंबिय प्रशालेला नेहमी शैक्षणिक मदत करत असतात या वर्षी प्रशालेला तीनशे वह्या कै श्रीधरराव नाईक यांच्या स्मृती निमित्त देणगी देवून उपकृत केले प्रशालेचे पर्यवेक्षक श्री वणवे सरांनी प्रास्ताविक करून नाईक कुटुंबियांचे आभार मानले यावेळी श्री संकेत नाईक साहेब यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री प्रसाद राणे सरांनी केले यावेळी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते