*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन कुर्ली प्राथमिक शाळेत वह्या वाटप*
*भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळाचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री सन्माननीय श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्र मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, महाराष्ट्र राज्य किसान मोर्च्या सरचिटणीस राजन चिके, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अमित दळवी, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ अध्यक्ष राजेंद्र कोलते, सुमन गुरव, अमित चव्हाण, सुनील राणे, अनंत राणे, अलंकार राणे, कृष्णा परब, सखाराम हुंबे, विनायक कुबडे, विजय आग्रे, प्रशांत दळवी, केशव दळवी, सचिन साळसकर, हर्षल चव्हाण, अरुण पवार,गजानन पवार,विजय कोलते, मुख्याध्यापक जोशी मॅडम, योगिता मडवी इतर ग्रामस्थ, पालक ,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.