*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणेंना सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो*
*असलदे ग्रामस्थांचे श्री देव रामेश्वर , पावणादेवी चरणी साकडे ; दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे रामेश्वर विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तु व फळ वाटप करण्यात आले. दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे संदेश शेटये यांच्याकडे या जीवनावश्यक वस्तु सुपुर्द करण्यात आल्या. तसेच गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व पावणादेवी मंदिरात पालकमंत्री नितेश राणे यांना पुढील वाटचालीत यश, समृध्दी,दीर्घायुष्य लाभण्यासाठी अभिषेक झाल्यानंतर गाऱ्हाणे घालत पालकमंत्री नितेश राणेंना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो, असे साकडे असलदे ग्रामस्थांनी घातले.
यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर , भाजपा उपाध्यक्ष रघुनाथ लोके, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे ,उदय परब , शामराव परब , परशुराम परब , बूथ अध्यक्ष संतोष परब,माजी सरपंच सुरेश लोके ,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , भाजपा सचिव विजय आचरेकर , भाजपा युवामोर्चा शक्तीकेंद्रप्रमुख प्रविण डगरे , बुवा आत्माराम घाडी , प्रदीप हरमलकर, संतोष घाडी , ग्रा.प.सदस्य विद्या आचरेकर , विजया खरात , सुवर्णा दळवी , दिलीप डामरे , मंगेश साळसकर , मधुसुदन परब , ग्रामसेवक संजय तांबे , संदेश शेटये, अनिल परब , रोहित परब आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.*