*कोंकण एक्सप्रेस*
*शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा ४६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.*
*शिवडाव ः प्रतिनिधी*
शिवडाव येथे १८ जून, २०२५ रोजी शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा ४६ वा वर्धापन दिन शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष मा.श्री.श्रीरंग शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी व पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत आलेल्या पालकांचे व प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी ढोल- ताशांच्या गजरात झांज पथकासह स्वागत केले. .ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व यानंतर सरस्वती मातेचे पूजन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री . पवार सर यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेचा समग्र इतिहास व शाळेचा वार्षिक लेखाजोखा पालकांसमोर मांडला. यावेळी शाळेचे संस्थापक सदस्य व शिवडाव सेवा संघ, मुंबईचे माजी अध्यक्ष श्री.म. कृ.तवटे साहेब यांच्या सौजन्याने इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांचे वही व कंपास बॉक्स देऊन प्रशालेमध्ये स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे NMMS परीक्षेतील गुणवंत कु.आदित्य कोरगावकर , कु.अनिरूध्द केणी तसेच कु.तन्मय गावडे यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांना वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत शिरसाट यांच्या सौजन्याने स्वादिष्ट मिठाई वाटण्यात आली.शाळेचे माजी विद्यार्थी श्री.आनंद काशिराम शिरसाट यांच्या कल्पनेतून सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी डॉ.अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे इयत्ता आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी कणकवली एसटी आगार प्रमुख मा.श्री.अजय गायकवाड साहेब यांनी या ग्रामीण भागातील शाळेचे कौतुक केले. तसेच एसटी सेवा नियमितपणे चालू ठेवण्याची ग्वाही दिली.यावेळी शाळा तिथे एसटी पास या उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर योजनेतून मुलींना पासांचे वितरण करण्यात आले.शिवडाव सेवा संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष मा.श्री.मोहन पाताडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना गुगल सीईओ श्री.सुंदर पिचाई यांची कहाणी सांगून अभ्यासाचे महत्त्व विशद केले. शालेय समितीच्या अध्यक्षा मा.श्रीमती भाग्यरेखा दळवी मॅडम यांनी प्रशालेच्या माजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. शिवडाव सेवा संघ,मुंबईचे अध्यक्ष मा.श्री.श्रीरंग शिरसाट साहेब यांनी शिक्षकांना व पालकांना समाजसेवेचा संदेश दिला. मा. श्री . विवेक गांवकर यांनी भविष्यात ज्ञानाबरोबर कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आ.श्रीम.दळवी मॅडम यांच्याकडून स्वादिष्ट अशा भोजनाची व्यवस्था केली होती. या संपूर्ण कार्यक्रमास डॉ.के.आर.पाटील सर यांच्या मधुर सूत्रसंचालनाने रंगत आणली. तसेच प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक श्री .तवटे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी मा.श्री.अजय गायकवाड , मा.श्री.श्रीरंग शिरसाट ,मा.श्री. मोहन पाताडे ,मा.श्री.विवेक गावकर मा.श्री.एकनाथ मळये ,मा. श्रीम.भाग्यरेखा दळवी , मा . श्री.विद्याधर गांवकर,मा.रूपाली शिरसाट, शिवडाव गावचे सरपंच मा.श्री.नितीश भिसे, उपसरपंच मा .सौ . सायली तेली, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.अभिषेक नाडकर्णी, मा.श्री.चंद्रकांत शिरसाट, शालेय समिती सदस्य.आर्किटेक्ट मा.श्री. गणेश म्हसकर,मा. प्रा .विजय सावंत, एसटी प्रशासनाचे श्री.मुळदेकर, श्री. शिरकर , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.