*कोंकण एक्सप्रेस*
*ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांचे निधन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील गांगोवाडी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ पत्रकार आनंद विठ्ठल अंधारी (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्न व समस्यांना आपल्या लेखनीतून वाचा फोडली. सामाजिक, सांस्कृततीक,शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. सिंधुदुगर्जना साप्ताहिकच्या माध्यमातूम सर्वसामान्य जनेतेचा आवाज बनत त्याला वाचा फोडली. स्पष्ट वक्ते हा त्यांचा स्वभाव होता. याच सोबत उत्तम लेखक व ज्ञान प्रबोधन यातुन त्यांनी आपली आवड जोपासली. कणकवली विद्यामंदिर प्रशालेला २ लाखांची आर्थिक मदतीतून प्रशालेतून पाचवी ते दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जायचा. अशा लढावंव्या व्यक्तीस मुखल्याची भावना सर्वसामान्य नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरानी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राज इलेक्ट्रिक चे मालक प्रदीप व राज मोबाईलचे मालक संतोष अंधारी यांचे ते वडील होत.त्याच्यावर आज 7. 30 वाजता कणकवली स्म्शानभूमती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.