*महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025 मध्ये कु. मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याने स्थान पटकावले*

*महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025 मध्ये कु. मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याने स्थान पटकावले*

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025 मध्ये कु. मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याने स्थान पटकावले*

*मालवण दि प्रतिनिधी*

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेतील गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक विद्यार्थी (सिल्वर कॅटेगिरी) या प्रकारात वराडकर हायस्कूल कट्टा च्या इयत्ता – पाचवी चा कु. मधुर अर्जुन पेंडूरकर या विद्यार्थ्याने स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये पार पडते, गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा टप्प्यातून ही परीक्षा पार पाडली जाते. यातील गुणवान विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मधुरच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष – श्री अजयराज वराडकर उपाध्यक्ष- श्री आनंद वराडकर व श्री शेखर पेंणकर, सचिव- श्री सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई मॅडम, खजिनदार – श्री रवींद्रनाथ पावसकर, सहसचिव – श्री साबाजी गावडे सर , सर्व संचालक मंडळ व विश्वस्त मंडळ तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!