*दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना*

*दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना*

*कोंकण एक्सप्रेस*

*दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना*

*कणकवली तालुक्यातील असलदे , कळसुली, नांदगाव येथे शिबिर*

*तळेरे*

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 150 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

दिविजा वृद्धाश्रम कोकणातील ग्रामीण भागातील खेड्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव संस्था आहे. दिविजा वृद्धाश्रमार्फत शालेय मुलांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. सामाजिक उपक्रमा बरोबरच ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातील एक उपक्रम म्हणजे मोबाईल डेंटल व्हॅन दिविजा वृद्धाश्रम व मुंबई चे डॉ.किसन गारगोटे व त्यांचा पुत्र डॉ कृतेश गारगोटे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी दंत चिकित्साचे आयोजन केले जाते.

त्यामध्ये दाताची किड साफ करणे, दाताचे फिलिंग करणे,दात काढणे,रूट कॅनल,कवळी बसवणे असे उपचार गोर-गरीब जनतेसाठी मोफत केले जातात. जून महिन्यात दिनांक 13 ते 15 जून 2025 या कालावधीत दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५० गरजवंत लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच त्यात ५० रुग्णांचे दात काढण्यात आले. २० जणांचे कवळ्यांचे माप घेण्यात आले. ५० जणांचे दात साफ करण्यात आले तर ३० जणांचे फिलिंग करण्यात आले.

ग्रामीण भागातील गरजवंत लोकांना दाताचे उपचार मोफत होऊ लागल्याने त्यांच्या ही चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!