*करीअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये सौर ऊर्जा जनजागृती अभियान*

*करीअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये सौर ऊर्जा जनजागृती अभियान*

*कोंकण एक्सप्रेस*

*करीअर कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये सौर ऊर्जा जनजागृती अभियान*

*५५५५५ तरुणांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येणार*

*शिरगांव : संतोष साळसकर*

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विरार येथिल विवा कॉलेज यांच्या सहकार्याने महाविद्यालयामध्ये सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे
सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ हा उपक्रम २१ वं २२ जून या कालावधित महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत ५५५५५ तरुणांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांमधील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी असे १०० टक्के या अभियानामध्ये सहभाग नोंदवतील अशा महाविद्यालयांना १०० टक्के सौर उर्जा पुरस्कारप्राप्त कॅम्पस हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थी व महाविद्यालयांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात ३० मिनिटांचे ऑनलाईन व्याव्खान देण्यात येणार असून त्यावर परिक्षा होणार आहे. विद्यार्थी निवड ही परिक्षेमधील गुणांकनानुसार केली जाणार आहे. जिल्हास्तरीय प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच प्रथम व व्दीतीय आलेल्या महाविद्यालयांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. विभागीय पातळीवर दोन महाविद्यालयांची तर राज्यस्तरीयसाठी पाच महाविद्यालयांची निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण अभियानात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयांसाठी २० जून रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यत तर विद्यार्थ्यासाठी २१ जुन रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत महाविद्यालयामार्फत नोंदणी करता येणार आहे. प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण २१ जुन रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २२ जून सांयकाळी ५ वाजेपर्यत होणार आहे. सौर उर्जा जनजागृती अभियानांत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होण्यासाठी शिरगांव येथिल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याना याबाबत १६ आणि १७ जुन रोजी माहिती देण्यात आली. देवगड तालुक्यातील पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालय या सौर ऊर्जा जनजागृती अभियानात सहभागी होणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन करिअर कट्टाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!