कणकवली गणपती सना येथे उभारणार धबधबा

कणकवली गणपती सना येथे उभारणार धबधबा

*कोकण Express*

*कणकवली गणपती सना येथे उभारणार धबधबा*

*कणकवलीत १२ ही महिने पर्यटकांना धबधब्याचा आनंद*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*कणकवली ःः प्रतिनिधी  

कणकवली नगरपंचायत २०१८ साली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व आम. नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवत जनतेने आमच्याजवळ दिली.कणकवली शहराच्या सौदर्यात भर टाकण्यासाठी पर्यटन व युवकांसाठी एक प्रकल्प करायचा आहे.आम.नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आम्ही हा प्रकल्प करत आहोत.कणकवली गणपती सना येथे भव्य धबधबा करण्यात येणार आहे.हा धबधबा २ कोटी ४६ लाख निधी खर्च करुन उभारण्यात येणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. कणकवली नगराध्यक्ष दालनात गटनेते संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू  गायकवाड, अभिजित मुसळे, किशोर राणे, शिशिर परुळेकर, महेश सावंत, अजय गांगण आदी उपस्थित होते.

कणकवली शहराच्या पर्यटन दृष्टीने व आर्थिक विकासाला चालना देणारा हा धबधबा प्रकल्प आहे.या धबधब्याची ६ मीटर उंची व १८ मीटर लांबी असणार आहे.वर्षांचे १२ महिने हा धबधबा वाहता असणार आहे.या धबधबा प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेतून हा प्रकल्प होणार आहे,असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.गणपती साना या ठिकाणी पूर रेषेच्या उंचीवर हा धबधबा असणार आहे. नैसर्गिक धबधबा आहे,असेच तो असेल.पाण्याचा क्लोरीन प्लँट केलेलाअसणार आहे.त्या धबधब्याला ३ पंप आहेत,एक दिवसानंतर नदीत विसर्ग होणार आहे.नंतर नव्याने पाणी घेतले जाईल.पाण्याचा वेंस्टेज किंवा त्या पाण्यात पर्यटकांना आजारही होणार नाही, असे बंडू हर्णे यांनी सांगितले.

कणकवली या धबधबा पर्यटक आल्यानंतर त्यांच्या सोयीसाठी मोबाईल टॉयलेट १० सीटर करण्यात येणार आहे.नवीन कन्सेप्ट आहे,व्हर्टिकल गार्डन करण्यात येणार आहे.सर्व भिंतीवर गार्डन असेल,हक्काने पर्यटकांना किंवा कणकवलीकरांच्या नातेवाईकांना आनंद घेण्यात येईल.आ.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.पावसाळ्यात फक्त धबधब्यांचा पर्यटकांना आनंद घेता येतो,आता कणकवलीत १२ ही महिने पर्यटकांना आनंद घेता येणार आहे, असे बंडू हर्णे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!