*वेंगुर्लेतील मठ चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली 60 लाखाची गोवा बनावटीची दारु*

*वेंगुर्लेतील मठ चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली 60 लाखाची गोवा बनावटीची दारु*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्लेतील मठ चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली 60 लाखाची गोवा बनावटीची दारु*

*आयशर टेम्पोने नेली जात होती दारु*

*वेंगुर्ले (वार्ताहर)- प्रथमेश गुरव*

राजस्थान राज्यातील सुरखंडा खेडा येथील धर्मेशकुमार पुरुषोत्तम चोबीसा (४४) यांस मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारांस मठ तिठा (मठ चेकपोस्ट नजीक) वेंगुर्ले 60 लाख रूपयांची रॉयल ब्ल्यू व्हिस्की व
देशी दारु टँगो पंच नामक गोवा बनावटीच्या दारू बेकायदा, बिगर परवाना आयशर टेम्पोमधून वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. गोवा बनावटीच्या दारूसह आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून वेंगुर्ले पोलीस स्टेसनमध्ये आणण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हि कारवाई करण्यात आली. यातील आयशर टेम्पो नं. युपी.-२१-ईटी-००४१ हा माल वाहक टेम्पो माल भरून जात होता. या टेम्पोची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची रॉयल ब्ल्यू व्हिस्की असे लेबल असलेले १८० मिली मापाच्या ४८ बाटल्यांचा बॉक्स प्रती बटलीची किंमत रू १०० प्रमाणे ८०० मुठ्ठयाचे बॉक्स सुमारे किंमत रू ३८,४०,००० तसेच देशी दारु टँगो पंच असे लेबल असलेले ९० मिली मापाच्या १०० बाटल्या प्रती बटली किंत रू ५० प्रमाणे असलेले २५० बॉक्स असे सुमारे किंमत १२,५०,००० असे मिळून एकूण दारू मद्देमाल रू ५०,९०,००० चा मुद्देमाल गाडीत आढळून आला. या मालासह सुमारे २० लाख किंमतीचा तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो असा एकूण ७०,९०,००० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी वेंगुर्ले पोलीसांत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे आरोपी धर्मेशकुमार पुरुषोत्तम चोबीसा याचेवर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!