*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख येथे कमी शिक्षक संख्या असल्याने ग्रामस्थ पालकांचे गट शिक्षण अधिकारी अधिकारी पंचायत समिती मालवण यांना निवेदन*

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख येथे कमी शिक्षक संख्या असल्याने ग्रामस्थ पालकांचे गट शिक्षण अधिकारी अधिकारी पंचायत समिती मालवण यांना निवेदन*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख येथे कमी शिक्षक संख्या असल्याने ग्रामस्थ पालकांचे गट शिक्षण अधिकारी अधिकारी पंचायत समिती मालवण यांना निवेदन*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील एक मोठे व प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे नांदरुख, या गावात ८-९ वाड्या असून या सर्व वाड्यांसाठी असलेली एकमेद शाळा म्हणजे जि. प. पु. प्रा. शाळा नांदरुख-आंबडोस संपुर्ण गावात हि एकच शाळा आहे, आणि आम्हाला आमच्या गावची शान असलेली हि शाळा टिकवायची आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या शाळेला पुर्णवेळ शिक्षक न मिळाल्यामुळे या शाळेची पटसंख्या कमी झाली सद्यस्थितीत या शाळेची पटसंख्या इयत्ता १ ते ५ साठी १३ व इयत्ता ६ ते ७ साठी १ आहे. त्यासाठी मंजूर २ पदांपैकी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. शाळेत ५ वर्गखोल्या आहेत तसेच आमच्या शाळेत संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा या गोष्टीदेखील इ. 6-7 साठी उपलब्ध आहेत. 6-7 चे वर्ग टिकून राहावेत म्हणून आमचे पाल्य आम्ही याच शाळेत पाठविण्याचे ठरवले आहे. परंतु गेल्या 2 वर्षांपासून एकही पदवीधर शिक्षक न मिळाल्यामुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याविषयी संभ्रमावस्थेत आहेत.
त्यातुन असे समजले की भरती बदली प्रक्रियेवेळी शाळेत रिक्त जागा न दाखवल्यामुळे कोणतेही शिक्षक शाळेत येऊ शकले नाही.त्यामुळे आम्हा सर्व पालक व गावकऱ्यांची विनंती आहे की चालु असलेल्या बदली / भरती प्रक्रियेत उपशिक्षक 1 व पदवीधर 1 अशी रिक्त पदे दाखवावीत.स्वरूपात उपशिक्षक व पदवीधर शिक्षक यांची नियुक्ती शाळेवर करावी. (काही छोट्या शाळांमध्ये 10 पटापर्यंत 2 शिक्षक आहेत.) शासनाचे सर्व उपक्रम राबविण्यासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी, सह‌कार्य अपेक्षित आहे अशी विनंती ग्रामस्थ व पालक वर्गाने केली आहे यावेळी माजी सरपंच दिनेश चव्हाण, माजी उपसरपंच विकास चव्हाण, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर पाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सलोनी पाटकर ग्रामस्थ गजानन चव्हाण, विनोद चव्हाण, विलास चव्हाण, साक्षी कांबळी, अक्षता पाटकर, पुर्वा चव्हाण, संचिता चव्हाण, सुजाता भगत, अश्विनी चव्हाण आदी ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!