*जिल्हा परिषद शाळातून मिळते दर्जेदार शिक्षण गटविकास अधिकारी वृक्षाली यादव*

*जिल्हा परिषद शाळातून मिळते दर्जेदार शिक्षण गटविकास अधिकारी वृक्षाली यादव*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद शाळातून मिळते दर्जेदार शिक्षण गटविकास अधिकारी वृक्षाली यादव*

*देवगड : प्रशांत वाडेकर*

जिल्हा परिषद शाळांमधून सीबीएससी धर्तीवर बदलत्या अभ्यासक्रमाचा उल्लेख करीत दर्जेदार शिक्षण देण्याची गरज ओळखून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, असे मत पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी व्यक्त केले.
देवगड सडा येथील जि प शाळेतील विद्यार्थी वर्ग प्रवेश पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व भाजप युवामोर्चाचे देवगड जामसंडे शहरअध्यक्ष दयानंद पाटील,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मांडवकर, सदस्य कदम, मुख्याध्यापक राजम, शिक्षक साळसकर, मुणगेकर आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी यादव म्हणाल्या, देवगड सडा शाळा राबवित असलेल्या उपक्रमांना शुभेच्छा देत शाळेला आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल देणगीदार यांना प्रशासनाकडून धन्यवाद दिले.एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
गटविकास अधिकारी वर्ग-१ वृक्षाली यादव यांच्या उपस्थित शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला. यादरम्यान इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि इतर वर्गातील ही सर्व विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आदी शैक्षणिक’ साहित्य वाटप करण्यात आले. त्याच बरोबर पहिलीच्या पालकांना फुलझाडे वाटप करत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबविण्यात आला. पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले. विशेष बाब म्हणून शाळेला CCTV cameras देणारे दयानंद पाटील यांचा गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!