*कोंकण एक्सप्रेस*
*राजमाता जिजाऊ पुण्यतिथी संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील भाजपाच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी राजमातांच्या जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती सादर केली. यावेळी भाजपाचे बाळू देसाई, पपू परब, सुहास गवंडळकर, सुजाता पडवळ, प्रणव वायंगणकर, दादा केळुसकर, आकांक्षा परब, श्रेया मयेकर, पूजा कर्पे, हसिना मकानदार, रसिका मठकर, मानसी परब, वृंदा मोर्डेकर, शरद मेस्त्री, कौस्तुभ वायंगणकर, सायमन अल्मेडा, वैभव होडावडेकर, राजन परब, प्रसाद वेंगुर्लेकर, दिलीप परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.