*पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव*

*पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव*

*कोंकण एक्सप्रेस*

*पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव*

*गटविकास अधिकारी आर डी जंगली यांची उपस्थिती उत्साहात संपन्न*

*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*

शैक्षणिक वर्ष 2025 -26 च्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमांतर्गत पीएम श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे दाखल होणाऱ्या नवीन मुलांचे प्रभात फेरी, औक्षण, पहिले पाऊल ठसा, वाजत गाजत दिमाखदार पद्धतीने गटविकास अधिकारी आर डी जंगले यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमासाठी 100 शाळा भेटी अंतर्गत आर डी जंगले गटविकास अधिकारी, वैभववाडी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वाटप व बूट पायमोजे याचे वितरण करण्यात आले. श्री जंगले साहेब यांनी उपस्थित विद्यार्थी पालक यांना जिल्हा परिषद च्या मराठी शाळेविषयी, शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री रामचंद्र जाधव केंद्रप्रमुख, श्री संजय शेळके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सौ श्रीया धावले, सौ रुपाली गावडे, सुषमा दळवी, श्री नंदकुमार हुले, श्री राजू जाधव, तेजस साळुंखे, मुख्याध्यापक श्री दिनकर केळकर, श्रीम मनीषा साठे मॅडम, कोकाटे मॅडम, सौ निकम मॅडम, सौ गांधी मॅडम, व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!